नवी दिल्ली । कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीवरून सुरू असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन माओवादी आणि डाव्यांनी हायजॅक केले असल्याचा केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचा आरोप शेतकरी नेत्यांनी फेटाळून लावला
शेतकऱ्यांचे आंदोलन माओवादी आणि डाव्यांनी हायजॅक केले असल्याचा गंभीर आरोप केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी केला होता. शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंग बादल यांनीही यावरून गोयल यांच्यावर टीका केली आहे. दरम्यान दिल्लीपासून जवळ असलेल्या नोएडा येथे शेतकऱ्यांनी भाजप नेते व माजी केंद्रीय मंत्री महेश शर्मा यांना घेराव घालत शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याची मागणी केली. यावर शेतकरी नेत्यांनी जर असे असेल तर दोषींना सरकारने गजाआड केले पाहिजे, अशी प्रतिक्रिया दिली. अशा प्रकारची वक्तव्ये करणाऱ्या गोयल यांनी सार्वजनिकरित्या माफी मागितली पाहिजे, असे सुखबीर बादल म्हणाले. आंदोलनाला खलिस्तानी व राजकीय पक्षांशी जोडले जात आहे. ज्यात काहीही तथ्य नाही. सरकारमध्ये उच्च पदावर बसलेल्या लोकांकडून येत असलेली विधाने निंदाजनक आहेत.
शेतकरी संघटनांनी आपले आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतला असून 14 तारखेला ठिकठिकाणी प्रदर्शने केली जाणार आहेत. या आंदोलनाची रूपरेषा ठरविण्यासाठी आज सिंघु सीमेवर शेतकरी नेत्यांची बैठक झाली. तिकडे दिल्लीला लागून असलेल्या नोएडा येथे माजी केंद्रीय मंत्री महेश शर्मा यांना असंख्य शेतकऱ्यांनी घेराव घालून मागण्यांचे निवेदन दिले.