कोरोनाबाबत सरकार गंभीर नाही : फडणवीसांचा आरोप

मुंबई । राज्यभरात कोरोनाने थैमान घातले असले तरी सरकार याबाबत गंभीर नसल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केला. त्यांनी या मुद्यावरून राज्य सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले.

पुरवणी मागण्यांवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत भाषण केलं. यात त्यांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. महाराष्ट्रात कोरोनाची भयावह स्थिती आहे. कोरोनामुळे १६६ पोलिसांचा मृत्यू झाला आहे. २४ हजार आरोग्य सेवक संक्रमित झाले आहेत. खासगी दवाखान्यात रुग्णांची प्रचंड लूट सूरू असल्याचे फडणवीस म्हणाले.

महाराष्ट्रात मृत्यूचे थैमान सुरु असून एकूण कोविड मृत्यूपैकी ३८ टक्के मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. सर्व गावांमध्ये कोरोना पोहोचलाय, असे सांगत फडणवीस यांनी कोल्हापूर, सांगलीतील स्थितीचा आपल्या भाषणात उल्लेख केला. महाराष्ट्र कोविडचा हॉटस्पॉट बनला असून यावर चर्चा करायची नाही का? असा सवाल करत फडणवीस यांनी कोरोनाबाबत सरकार गंभीर नसल्याचा आरोप केला.

Protected Content