नवी दिल्ली वृत्तसंस्था । एकीकडे सत्ता स्थापनेबाबत विरोधकांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली असतांना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आज सकाळी याबाबत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याशी चर्चा केली आहे.
दिल्लीत आज राज्यपालांच्या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हेदेखील दिल्लीला गेले आहेत. दरम्यान, परिषद सुरू होण्याआधीच आज सकाळी राज्यपालांनी राष्ट्रपती भवनात जाऊन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याशी चर्चा केली. या चर्चेचा तपशील कळू शकला नसला तरी त्यांनी राजकीय स्थितीबाबत चर्चा केल्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात विरोधकांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली असून या पार्श्वभूमिवर, ही भेट महत्वाची मानली जात आहे.