मुंबई प्रतिनिधी । शिवसेनेला बहुमत सिध्द न करता आल्यानंतर आता राज्यपालांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापन करण्याचे निमंत्रण दिले आहे.
शिवसेनेला आज सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत सत्ता स्थापनेचा निर्णय घेण्याचे सूचित केले होते. मात्र विहीत कालावधीत शिवसेनेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पाठींबा मिळाला नाही. या पार्श्वभूमिवर, आता तिसर्या क्रमांकाचा पक्ष असणार्या राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यपालांनी सत्ता स्थापन करण्यासाठी आमंत्रीत केले आहे. राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार, धनंजय मुंडे, छगन भुजबळ, जयंत पाटील आदी नेत्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. याप्रसंगी राज्यपालांनी राष्ट्रवादीला सत्ता स्थापन करण्यासाठी आमंत्रीत केले. याबाबत निर्णय कळविण्यासाठी त्यांनी उद्या रात्री साडेआठ वाजेपर्यंतची वेळ देण्यात आली आहे.