अपघातात निधन झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना शासनाकडून आर्थिक मदत

जळगाव प्रतिनिधी । स्वा.सै.पं.ध.थेपडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय म्हसावद येथे राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना अंतर्गत दोन वर्षापूर्वी अपघाती निधन झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना शासनाकडून ७५ हजारांचा चेक सोपविण्यात आला आहे.

यासंदर्भात शासनाकडे विद्यालयामार्फत पाठपुरावा केला कागदपत्रांची पुर्तता केल्यानंतर दावा मंजूर होऊन शासनाकडून 75000/- रुपयांचा चेक त्याच्या आई व भाऊ यांना सोपवतांना विद्यालयाचे मुख्याध्यापक सोनार सर, उपमुख्याध्यापक बच्छाव सर, पर्यवेक्षक भंगाळे सर, ज्यू.कॉलेजचे विभाग प्रमुख योगराज चिंचोरे, निलेश पवार, शिक्षक प्रतिनिधी सचिन चव्हाण, कर्क भाऊसाहेब वाघ, विद्यालयाच्या प्रयत्नाने शासनाकडून मयत विद्यार्थ्याच्या कुटुंबाला मदत मिळाल्याने संस्थेचे चेअरमन डॉ. केदारजी थेपडे यांनी व माजी मुख्खाध्यापक पी.डी.पाटील, उपमुख्याध्यापक खोडपे सर, ज्यू.कॉलेज शिक्षक बंधू भगिनी तसेच माध्यमिक शिक्षक बंधू भगिनी, शाळेचे सर्व विद्यार्थी व पालकांनी समाधान व्यक्त केले.

 

Protected Content