यावल, प्रतिनिधी | येथील प्रसिद्ध महर्षी श्री व्यास महाराज यांच्या गुरुपौर्णिमेपासुन शहरातील मंदिरात भव्य असे पुजा अर्चनांचे कार्यक्रम सुरु आहेत. या गुरुपौर्णिमेचे औचित्य साधुन शहरातील मराठी अस्मिता प्रतिष्ठानने श्री व्यास नारायण भगवान यांची प्रतिमा सर्व शासकीय कार्यालयांना भेट दिली आहे. यावल शहर हे श्री व्यासांच्या पवित्र चरणस्पर्शाने पावन झालेले असल्याने शहरामधील शासकीय कार्यालयांमध्ये महर्षी व्यास महाराजांची प्रतिमा लावल्यास नव्याने येणाऱ्या व्यक्तीस ही ओळख तत्काळ लक्षात येणार आहे.
शहरातील तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार जितेन्द्र कुवर, निवासी नायब तहसीलदार आर.के. पवार, पोलीस स्टेशन, भुमि अभीलेख कार्यालय, नगर परिषद कार्यालयतील पाणी पुरवठा प्रमुख राजेन्द्र नारायण देवरे तसेच नगर परिषद कार्यालयात श्री व्यास नारायण भगवान यांचे भक्त, जेष्ठ समाजसेवक व अभ्यासक सुधाकर बाविस्कर यांच्या हस्ते मराठी अस्मिता प्रतिष्ठानचे अध्यक्ष चेतन अढळकर उपाध्यक्ष प्रशांत कासार, सचिव सुनील गावडे, सहसचिव नितीन बारी, कोषाध्यक्ष अशोक पाटील, कार्याध्यक्ष शिवाजी अस्वार, संदीप कुलकर्णी, अॅड. देवेंद्र बाविस्कर, डॉ. सागर, युवरास चौधरी व प्रतिष्ठानच्या पदाधिकारी यांच्या प्रमुख उपास्थितीत श्री व्यास महाराजांची प्रतिमा भेट देण्यात आली. यावेळी प्रतिष्ठानचे पदाधिकारी व इतर सामाजिक क्षेत्रात कार्य करणारे कार्यकर्त सह्भागी झाले होते.