Home राजकीय सरकार व्यापाऱ्यांना धमकी देऊन भाजपचा प्रचार करायला लावतेय : प्रकाश आंबेडकर

सरकार व्यापाऱ्यांना धमकी देऊन भाजपचा प्रचार करायला लावतेय : प्रकाश आंबेडकर


4Prakash Ambedkar 5 0
 

नांदेड (वृत्तसंस्था) सरकार व्यापाऱ्यांना धमकी देऊन भाजपचा प्रचार करायला लावत असल्याचा खळबळजनक आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. एवढेच नव्हे तर, आमचे सरकार आले तर जुन्या नोटा बदलून देऊ, असे आश्वासन देखील दिले आहे. नांदेड जिल्ह्यातील हदगाव इथल्या प्रचारसभेत आंबडेकर बोलत होते.

 

नोटाबंदीमुळे व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. अनेक व्यापाऱ्यांनी आत्महत्या केल्या. वरतून सरकार धमक्या देऊन व्यापाऱ्यांना भाजपचा प्रचार करायला भाग पाडत आहे. यावेळी आंबेडकर पुढे म्हणाले की, व्यापाऱ्यांकडे अद्याप जुन्या नोटा आहेत हे मला माहित आहे. आमचे सरकार आले तर या जुन्या नोटा बदलून देण्यात येतील, असे आश्वासन प्रकाश आंबेडकरांनी यावेळी दिले. “मात्र या चोरांचे सरकार पुन्हा येऊ देऊ नका, असेही ते म्हणाले. विशेष म्हणजे आंबडेकर यांच्या या वक्तव्यावर उपस्थितांनी टाळ्या वाजवत दाद दिली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound