जळगाव महापालिकेच्या आवारात शासकीय ध्वजारोहण उत्साहात

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भारतीय स्वातंत्र्याच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त जळगाव महानगरपालिकेत मंगळवार १५ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी महापौर जयश्री महाजन यांच्याहस्ते शासकीय ध्वजारोहण करण्यात आले.

 

भारतीय स्वातंत्र्याच्या ७६व्या वर्धापन दिनानिमित्त जळगाव शहरासह जिल्ह्यात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या अनुषंगाने जळगाव महानगरपालिकेच्या आवारात शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता. मंगळवारी  १५ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी महापौर जयश्री महाजन यांच्याहस्ते शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर बँड पथकाच्या माध्यमातून तिरंगाला मानवंदना देऊन राष्ट्रगीतचे सादरीकरण करण्यात आले. याप्रसंगी महापौर जयश्री महाजन यांनी “माझी माती माझा देश” या अभियानांतर्गत महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी यांना पंच प्रण प्रतिज्ञा देण्यात आली. याप्रसंगी जळगाव महानगरपालिकेच्या आयुक्ता डॉ. विद्या गायकवाड, उप आयुक्त अविनाश गांगुर्डे, उप आयुक्त निर्मला गायकवाड, अश्विनी गायकवाड, सहाय्यक आयुक्त गणेश चाटे, सहाय्यक आयुक्त अभिजीत बाविस्कर यांच्यासह महानगरपालिकेतील नगरसेवक प्रशासकीय अधिकारी वर्ग व कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी महापौर जयश्री महाजन यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.

Protected Content