चिंचखेडातील अत्याचारातुन खुन झालेल्या सहा वर्षीय मुलीच्या कुटुंबास शासनाची आर्थिक मदत

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील चिंचखेडा येथे ११ जून रोजी नराधमाकडून सहा वर्षे बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्याचा मनाला सुन्न करणारा संतापजनक प्रकार घडला होता. या घटनेचे पडसाद जळगाव जिल्ह्यासह संपुर्ण राज्यात पडले होते.

सदरच्या चिंचखेडा येथील खुन झालेल्या बालिकेच्या कुटुंबास राज्य शासनाच्या वतीने आर्थिक सहाय्य म्हणून यावल येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय यांच्यामार्फत न्युक्लिअस बजेट योजनेतून पन्नास हजार रूपयांची आर्थिक मदतीचा धनाकर्षे अत्याचारीत मुलीच्या कुटुंबास महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीश महाजन याच्या हस्ते देण्यांत आले. त्यावेळी आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी अरुण पवार, आदिवासी कार्यालयाचे लेखाधिकारी प्रविण रोकडे यांच्यासह कार्यालयातील आदि कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

Protected Content