बुलडाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राज्यात गणराया पाठोपाठ आज गौराईचे घरोघरी शुभ आगमन झाले आहे .अनेक ठिकाणी गौरीला महालक्ष्मी असेही संबोधले जाते .गौराईचे आगमन झाल्यानंतर घरोघरी पारंपारिक पद्धतीने पूजा करून नैवेद्य दाखवण्यात येतो. गौराईचे घरामध्ये आगमन झाल्यानंतर हळदीच्या ठशानी चंदनाचे बोट लावलेल्या पावलांचे ठसे घरभर उमटवून लक्ष्मीचे पावले रांगोळीच्या माध्यमातून गौराईच्या आगमनाच्या ठिकाणी काढल्या जातात.
गणरायाच्या आगमनानंतर लगेचच घरोघरी वेद लागतात ते गौरी महालक्ष्मीचे आगमनाचे. आज गौरीचे आगमन झाले असून विविध प्रकारे आनंदाच्या वातावरणात गौराईचे स्वागत करण्यात आले. महाराष्ट्रात गौरी आगमन ते विसर्जन हा तीन दिवसाचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. राज्यात विविध भागात गौरी आव्हान आणि मांडण्याच्या पद्धतीमध्ये व्हायविध आढळून येते .प्रत्येक जण आपल्या परंपरा पद्धत ने अनुसरून प्रतिवर्षी गौरी पूजन करतात. 22 सप्टेंबर 2023 रोजी घरोघरी गौरीचे आगमन झाले आहे.
महत्त्वाचे म्हणजे महालक्ष्मीची आगमन हा महिलांचा आवडता उत्सव सोहळा म्हणावा लागेल. घराची स्वच्छता करण्यापासून ते त्यासाठी वैविध्यपूर्ण खाद्यपदार्थाची मेजवानी आणि रेखीव कलाकुसरीच्या दागिन्याची भेट देऊन महिला महालक्ष्मीचे स्वागत करतात. महालक्ष्मी स्थापन होईपर्यंत महिलांची सजावटीची काम सुरूच असते. अनेक स्त्रिया रात्री जागून तयारी करतात. दरवर्षी घरामध्ये महालक्ष्मीच्या स्वागतासाठी नावीन्यपूर्ण साहित्याची सजावट करण्याची स्पर्धा असते. यावर्षी बाजारात विविध पद्धतीने सजविले गौरीचे विविध प्रकारचे मुखवटे बाजारात उपलब्ध होते. मुखवटे खरेदीला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे चित्र होते. त्यासोबतच मंगळसूत्र, बांगड्या नथ,मोत्याच्या माळा, जोडवी अशा पारंपारिक दागिन्यांचा विविध दागिन्यांची खरेदी करण्याची पसंती देखील मिळताना दिसली.
चौकाट
ज्येष्ठा गौरी हा सण नक्षत्र प्रधान आहे. दि. २१सप्टेंबर२०२३ गुरुवार सूर्योदयापासून ते दुपारी ०३:३५ पर्यंत अनुराधा नक्षत्र आहे. अनुराधा नक्षत्रावर गौरीचे अवाहन केले जाते त्यामुळे २१ सप्टेंबर रोजी दुपारी ०३:३५ पर्यंत कधीही गौरीचे आवाहन करू शकता. यावर्षी २१ सप्टेंबर२०२३ रोजी गुरुवारी सूर्योदयापासून दुपारी ०३:३५ पर्यंत अनुराधा नक्षत्र आहे तेंव्हा त्या दिवशी सूर्योदयानंतर ते दुपारी ०३:३५ पर्यंत केंव्हाही ज्येष्ठा कनिष्ठा गौरीचे अवाहन करून आपल्या घरात आणाव्यात.
गौरींची उपासना
भाद्रपद शुक्ल पक्षात अनुराधा नक्षत्रावर या ज्येष्ठा गौरींचे आगमन होते. त्यानंतर सलग ३ दिवस चालणार्या या सोहळ्यात २ दिवस आगमन आणि पूजा होत असून तिसर्या दिवशी त्यांचे विसर्जन केले जाते. ३ दिवसांचा हा उपासना विधींचा क्रम सर्वमान्य असला, तरी पूजनाची पद्धत आणि परंपरा या महाराष्ट्राच्या अंतर्गतही निरनिराळ्या आहेत. कोकणात एक, तर उर्वरित महाराष्ट्रात २ गौरींची, म्हणजेच दोन भगिनींची आरास असा प्रघात आहे. काही ठिकाणी गौरींसमवेत त्यांच्या सखी, तर इतर काही ठिकाणी त्यांची मुले यांची आरास करून पूजा केली जाते. ज्येष्ठा गौरींचे हे व्रत आज महाराष्ट्रात जरी प्रचलित असले, तरी उर्वरित भारतात न्यून-अधिक फरकाने ज्येष्ठा गौरींची उपासना केली जाते. प्रांतपरत्वे या उपासना विधींमध्ये भिन्नत्व आढळत असले, तरी त्यांचा गाभा मात्र एकच आहे.