साकेगाव, ता. भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | गोरक्षक प्रसाद खारकर यांनी रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेल्या नंदीवर उपचार करून त्याला जीवदान देण्याची घटना घडली आहे.
सारंगखेडा येथील देवीमातेच्या दर्शनासाठी निघालेले गोरक्षक प्रसाद खारकर यांना शिंदखेडयातील वारुळ गावात लगत हायवेवर एक नंदी जखमी अवस्थेत पडलेला दिसला. या संदर्भात त्यांनी तात्काळ भुसावळ शहरातील गोरक्षक रोहित महाले यांच्याशी संपर्क केला. त्यांनी शिंदखेडा भागातील गोरक्षक प्रणील मंडलीक यांच्याशी संपर्क केला. त्यांनी आपले् सर्व गोरक्षक बांधवांना घेत त्या नंदीवर उपचार करून त्याला जीवदान दिले.
यानंतर या सर्व गोरक्षकांनी दहिवद श्री कपिला गोशाळेत सोडून त्याचे प्राण वाचविले. यासाठी गोरक्षक भैय्या (माळी ) पेंटर, दिपक माळी,अमोल भदाणे, प्रशांत कोळी, विशाल भदाणे, राकेश कोळी, मोनु भदाणे, कमलेश पाटील, स्वप्निल पाटील, हर्षल लोहार प्रसाद खारकर प्रणील मंडलीक रोहित महाले यांचे सहकार्य लाभले.