प्ले स्टोअरवरील हे फ्रॉड लोन अ‍ॅप्स गुगलने केले डिलीट, तुमच्याकडे तर नाहीत ना?

मुंबई-वृत्तसेवा | लोन अ‍ॅप्सच्या माध्यमातून फसवणूक होण्याच्या घटनांचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच गुगलने आपल्या प्ले स्टोअरवरील 17 फेक लोन अ‍ॅप्सना डिलीट केलं आहे. हे अ‍ॅप्स खऱ्या लोन अ‍ॅप्सच्या रुपात उपलब्ध होते. मात्र, डाऊनलोड केल्यानंतर ते यूजर्सचा डेटा चोरुन हॅकर्सना देत होते.

ESET रिसर्चर्सने केलेल्या एका सर्वेक्षणात हे 17 अ‍ॅप्स समोर आले होते. या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, गुगलने डिलीट करण्यापूर्वी सुमारे 12 मिलियन लोकांनी हे अ‍ॅप्स डाऊनलोड केले होते.

गुगलने या अ‍ॅप्सची यादी प्रसिद्ध केली आहे. ही अ‍ॅप्स तुमच्या स्मार्टफोनमधील असतील, तर त्वरीत अनइन्स्टॉल करण्याचं आवाहन कंपनीने केलं आहे.

1.  4S Cash

2. AA Kredit

3. Amor Cash

4. Cashwow

5. CrediBus

6.GuayabaCash

7. EasyCredit

8. FlashLoan

9. Finupp Lending

10. TrueNaira

11. EasyCash

12. PréstamosCrédito

13. Préstamos De Crédito-YumiCash

14. Go Crédito

15. Instantáneo Préstamo

16. Cartera grande

17. Rápido Crédito

यातील बहुतांश लोन अ‍ॅप्स हे यूजर्सचा डेटा चोरत होते. काही अ‍ॅप्स यूजर्सना लोन दिल्यानंतर आवश्यकतेपेक्षा जास्त व्याज आकारत होते. पैसे परत करण्यासाठी 91 दिवसांऐवजी 5 दिवसांचा वेळ देणे, वर्षाला 160 ते 130 टक्के व्याज आकारणे असे प्रकार होत होते. तसंच वसूलीसाठी नागरिकांना ब्लॅकमेल करणे, धमकी देणे आणि त्रास देणे अशा गोष्टी या अ‍ॅप्सचे कर्मचारी करत होते.

 

Protected Content