
जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील बीएसएनएल कार्यालयातील स्टोअर रूम फोडून १ लाख ५ हजार रूपये किंमतीचा सामानांची चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. याबाबत बुधवारी २३ जुलै रोजी दुपारी ४ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव शहरातील बीएसएनएल कार्यलयातील स्टोअर रूममध्ये बॅटरी, इन्व्हर्टर आणि कॉपर केबल असा एकुण १ लाख ५ हजार रूपये किंमतीचा सामान ठेवण्यात आलेला होता. ५ जुलै रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने हा सर्व मुद्देमाल चोरून नेल्याचे उघडकीला आला. याबाबत कनिष्ठ दुरसंचार अधिकारी गौरव बालकुष्ण कुमार रा. जळगाव यांनी याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक उल्हास चऱ्हाटे हे करीत आहे.



