Home Uncategorized मालवाहू वाहनाने दुचाकीला उडविले : चौघे युवक जागीच ठार

मालवाहू वाहनाने दुचाकीला उडविले : चौघे युवक जागीच ठार

0
136

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मालवाहू वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेमुळे दुचाकीवरील चार युवक हे जागीच ठार झाल्याची भीषण दुर्घटना काल रात्री जामनेर तालुक्यातील पिंपळगाव गोलाईत जवळ घडली.

या संदर्भातील माहिती अशी की, जामनेर ते पहूर मार्गावर पिंपळगाव गोलाईत गावाजवळ काल रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास भीषण अपघात घडला. यात अत्ुाल चंद्रकांत सुरवाडे, अंकुश सुरेश लोखंडे, अजय फकीरा साबळे आणि रवी सुनील लोंढे हे चार युवक बाईकवरून जामनेरच्या दिशेने येत होते. तर सिल्लोड येथील व्यापारी जामनेरकडून आपल्या गावाकडे पीकअप व्हॅनने निघाला होता.

पिंपळगाव गोलाईत गावाजवळच्या वळणावर या मालवाहू वाहनाने या तरूणांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत दुचाकीवरील चारही युवकांचा जागीच मृत्यू झाला. तर पीकअप व्हॅनचा चालक जुबैर कुरेशी हा देखील यात जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीसांसह परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मृतदेह ग्रामीण रूग्णालयात हलविले.

या अपघातात मयत झालेले चारही युवक हे वीस ते बावीस वर्षे या वयोगटातील असून ते जामनेरचे रहिवासी आहेत. या चौघांच्या अपघाती मृत्यूमुळे परिसरावर शोककळा पसरली आहे. रात्री उशीरापर्यंत या संदर्भात पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.


Protected Content

Play sound