रावेर प्रतिनिधी । रावेर महसूल विभागात शेतकर्यांना दुष्काळ अनुदान वितरण करण्यासाठी तहसीलदार उषाराणी देवगुणे आपल्या सहकार्यांसोबत केलेली अविश्रांत मेहनत आता कौतुकाची बाब बनली आहे.
या बाबत वृत्त असे की शासना कडून तालुक्याला दुष्काळ निधी मिळाला होता. परंतु दिरंगाई मुळे हा निधी पडून होता अखेर शेतकर्यांच्या तक्रारी नंतर प्रशासन जागे होऊन पडून असलेले अनुदान संबधीत शेतकर्यांच्या खात्यावर जमा केले. अगदी कमी कालावधीत हे अनुदान वर्ग करण्यात आले आहे. आज पर्यंत २३ कोटी २८ लाख २८ हजार ९४६ रुपये शेतकर्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे. या कामी तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी अगदी दिवसरात्र मेहनत करून व सुटीच्या दिवशीदेखील काम करून परिश्रम घेतले. त्यांनी आपल्या सहकार्यांसह केलेल्या परिश्रमानेच तालुक्यातील शेतकर्यांना दुष्काळ निधीचा दिलासा मिळाला आहे.