खुशखबर : आरबीआयमध्ये मेगा भरती

rbi8 580x395

 

मुंबई वृत्तसंस्था । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये (आरबीआय) ९२६ सहाय्यक पदांसाठी भरती होणार आहे. यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार १६ जानेवारी २०२० पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात. आरबीआयकडून याबाबत अधिकृत अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे.

इच्छुक उमेदवार १६ जानेवारी २०२० पर्यंत अधिकृत वेबसाईट https://www.rbi.org.in/ वर जाऊन अर्ज करु शकतात. २३ डिसेंबर २०१८ पासून अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरूवात झाली आहे.

शैक्षणिक पात्रता :-
किमान ५० % गुणांसह कोणत्याही विषयात पदवी आणि संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक

वेतन :- ३६,०९१ रुपये (प्रति महिना)

वयोमर्यादा :- अर्जदाराचे किमान वय २० वर्ष आणि जास्तीत जास्त २८ वर्ष असावे

अर्ज शुल्क :- जनरल / ईडब्ल्यूएस / ओबीसी उमेदवारासाठी – ४५० रुपये; SC / ST / PWD / Ex-S अर्जदारासाठी – ५० रुपये

महत्त्वाच्या तारखा :- ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख – १६ जानेवारी २०२०, शुल्क भरण्याची अंतिम तारीख – १६ जानेवारी २०२० आणि ऑनलाइन परीक्षा तारीख – १४ आणि १५ फेब्रुवारी २०२०

Protected Content