मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर 46 वरुन 50 टक्के करण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयाचा राज्यातील हजारो कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.
सरकार कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वर्षातून दोनदा वाढ करते. 1 जानेवारी व 1 जुलै या तारखांना ही वाढ केली जाते. पण निर्णय उशिरा घेतला जातो. त्यानुसार सरकारने आज बुधवारी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 1 जुलैपासून 4 टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाच्या आदेशानुसार, ही वाढ 1 जानेवारी ते 30 जून 2024 या कालावधीतील थकबाकीसह जुलै 2024 च्या वेतनाबरोबर रोखीने दिली दिली जाणार आहे. शासकीय व निमशासकीयसह जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनाही या निर्णयाचा लाभ होणार आहे.