मद्यपींसाठी खुशखबर…. ‘ड्राय डे’ची संख्या घटणार

j2 8

 

मुंबई (वृत्तसंस्था) राज्यातील मद्यपींसाठी सरकार एक खुशखबर घेऊन आली आहे. त्यानुसार आत राज्यातील ड्राय डेची संख्या कमी होणार असून यासाठी राज्य सरकारने एक समिती नियुक्त केली आहे. राज्यात सणानुसार प्रत्येक शहरात ‘ड्राय डे’ जाहीर करण्यात येतो. समितीच्या अहवालानंतर राज्यात सर्वत्र ‘ड्राय डे’चे समान धोरण असेल, अशी माहिती राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

 

जिल्ह्यातील सण-उत्सवानुसार ड्राय डे घोषित करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहेत. काही ठिकाणी ड्राय डेच्या नावाखाली गरज नसतानाही मद्याची दुकाने बंद केली जातात. त्यामुळे राज्यातील ड्राय डे धोरणासंदर्भात सुस्पष्टता आणि सुसूत्रता यावी यासाठी सरकारने एक समिती नियुक्त केली असल्याची माहिती राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. ‘ड्राय डे’संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना जे अधिकार आहेत, त्याऐवजी संपूर्ण राज्यात ‘ड्राय डे’चे समान धोरण कसे राबवता येईल, यासंदर्भात राज्य सरकारचा विचार सुरु आहे, असल्याचे देखील श्री.बावनकुळे यांनी सांगितले.

Add Comment

Protected Content