Home करियर आनंदाची बातमी : बँकिंग क्षेत्रात लवकरच ११६३ जागांची भरती होणार

आनंदाची बातमी : बँकिंग क्षेत्रात लवकरच ११६३ जागांची भरती होणार


bank office

नवीदिल्ली, वृत्तसंस्था | बँकिंग क्षेत्रात नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे. इंस्टिट्यूट ऑफ बँकिंग अँड पर्सनल सिलेक्शन अर्थात आयबीपीएसने (IBPS)विशेष अधिकारी (स्पेशलिस्ट ऑफिसर, SO)पदाच्या एकूण ११६३ जागांसाठी भरती जाहीर केली आहे. यामध्ये, कृषी क्षेत्र अधिकारी(स्केल- I), आयटी अधिकारी (स्केल- I),कायदा अधिकारी (स्केल- I), राजभाषा अधिकारी (स्केल- I), मार्केटिंग ऑफिसर (स्केल- I) आणि मानव संसाधन / वैयक्तिक अधिकारी (स्केल- I) या पदांचा समावेश आहे.

 

यासाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन प्रक्रियेला ६ नोव्हेंबरपासून सुरूवात झाली आहे. २६ नोव्हेंबर अर्ज करण्याची अखेर तारीख आहे. आयबीपीएसच्या ibps.in या अधिकृत संकेत स्थळावरुन इच्छुकांना अर्ज करता येईल. स्पेशलिस्ट ऑफिसर पदासाठी उमेदवारांची निवड तीन टप्प्यांमध्ये केली जाणार आहे.
पहिल्या टप्प्यात २८ आणि २९ डिसेंबर रोजी पूर्व परीक्षा होईल. याचा निकाल जानेवारीमध्ये येईल, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात मुख्य परीक्षा होईल. मुख्य परीक्षा २५ जानेवारी २०२० रोजी ऑनलाइन पद्धतीने घेतली जाईल. त्यानंतर अखेर फेब्रुवारी महिन्यामध्ये मुलाखत घेतली जाईल. अशाप्रकारे उमेदवाराची निवड केली जाईल. या पदांसाठी अर्ज करणाऱ्याचे वय २० ते ३० च्या दरम्यान असावे. प्रत्येक पदासाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता लागणार आहे. परिणामी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत संकेत स्थळावर (ibps.in)असेलेले नोटीफीकेशन पाहूनच अर्ज करावा.


Protected Content

Play sound