खुशखबर : दीड वर्षात १० लाख तरूणांना मिळणार नोकर्‍या !

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले सरकार दीड वर्षात १० लाख नोकर्‍या देणार असल्याची आज घोषणा केली आहे.

नरेंद्र मोदी यांच्या ट्विटर अकाऊंटवरून आज सकाळी एक ट्विट करण्यात आले. यात मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून आलेल्या माहितीनुसार नोकर्‍यांचे नियोजन करण्यात आले आहे. यानुसार येत्या दीड वर्षांमध्ये १० लाख नोकर्‍या प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती या ट्विटमध्ये देण्यात आलेली आहे.

देशात सध्या महागाई कडाडलेली असतांनाच बेरोजगारी वाढल्याचे देखील दिसून येत आहे. मोदी सरकारने आधी सुध्दा देशात रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणात झाली असल्याचे दावे केले होते. मात्र यावर विरोधकांनी टिका केली असतांना आता पुन्हा एकदा देशात १० लाख नोकर्‍या देण्यात येणार असल्याचे आश्‍वासन देण्यात आले आहे.

 

Protected Content