गोंडगाव प्रकरणाचा रावेरात तीव्र निषेध; प्रशासनाला निवेदन

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करुन निर्घृण हत्या केल्याच्या निषेध व्यक्त करण्यात आला. याचे निवेदनरावेर तालुका सूर्यवंशी क्षत्रिय मराठा समाजातर्फे रावेर तहसीलदार बंडू कापसे यांना निवदेन देण्यात आला.  दरम्यान जिल्हाधिकारी आयुष प्रसाद रावेर तालुक्यात आले असता. त्यांनी सांगितले मी स्वत: गोंडगाव येथे पीडीत कुटुबांची भेट घेणार आहे. त्यांच्या कुटुबांना शासनाच्या वतीने शक्य होईल ते मदत करणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी मराठा समाजाच्या बांधवांना सांगितले.

 

सुरवातील छत्रपती शिवाजी चौक परीसरात शोक सभा घेऊन मयत कु कल्याणी यांना श्रद्धांजली दिली, निवेदनात म्हटले आहे की, भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करुन निघृण हत्याकेल्या बद्दल जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. पुरोगामी महाराष्ट्रात काळीमा फासणारी घटना घडलेली आहे, नराधमाने केलेल्या पाशवी, अमानवीय कृत्य केल्याबद्दल अशा नराधमास भर चौकात फासावर चढवावे. जेणे करुन असे अमानवीय कृत्य करण्याची हिम्मत कुणाची होणार नाही. त्या निरपराध बालिकेस न्याय मिळावा.अशी मागणी सूर्यवंशी क्षत्रिय मराठा समाज रावेरच्या वतीने करण्यात आली. यावेळी सूर्यवंशी क्षत्रिय मराठा समाजाचे अध्यक्ष गंगाराम दाणी उपाध्यक्ष अशोक शिंदे, सचिव श्रीराम पाटील, दिलीप पाटील, राजेश शिंदे, ज्ञानेश्वर महाजन, शालिक महाजन, सुभाष शिंदे, दिलीप गायकवाड, मिलिंद महाजन, भावलाल महाजन, अशोक गायकवाड, सुनिल महाजन, मुकेश पाटील, मधुकर शिंदे, विजय महाजन, दिपक शिंदे, धनराज महाजन, पिंटू महाजन, बापू महाजन, सदाशिव पाटील, धनराज महाजन, उमाकांत महाजन, दिपक शिंदे, पुष्पराज महाजन, ज्ञानेश्वर पाटील, माधवराज राऊत, शिवलाल शिंदे, ईश्वर शिंदे, मनोज पाटील, अशोक महाजन, अनिल महाजन, भूषण महाजन, हर्षल गायकड, योगेश शिंदे, सिमा दाणी, पूजा महाजन, संगीता गायकवाड यांच्यासह मोठ्या संख्येने मराठा समाजाचे बांधव उपस्थित होते.

 

जिल्हाधिकारी घेणार पीडीत कुटुंबाची भेट

दरम्यान रावेर तहसील कार्यालयात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद प्रशासकीय कामा निमित्त रावेर तालुक्यात आले होते.यावेळी मराठा समाजाच्या बांधवांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन पीडीत कुटुंब प्रचंड गरीब असून त्यांना शासनाच्या वतीने जास्तीत जास्त मदत करावे व आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले मी स्वता: गोंडगाव येथे जाऊन पीडीत कुटुंबाची भेट घेणार असल्याचे मराठा समाजाच्या बांधवांना सांगितले.

Protected Content