Home उद्योग नवउद्योजकांसाठी सुवर्णसंधी ; ‘जैन संघटने’तर्फे विनामूल्य बिझनेस डेव्हलपमेंट कार्यशाळेचे आयोजन!

नवउद्योजकांसाठी सुवर्णसंधी ; ‘जैन संघटने’तर्फे विनामूल्य बिझनेस डेव्हलपमेंट कार्यशाळेचे आयोजन!


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील तरुण आणि महिला नवउद्योजकांना व्यवसायाची नवी दिशा देण्यासाठी भारतीय जैन संघटनाआणि लोकमत मीडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सक्षम’ उपक्रमांतर्गत एका विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही ‘MSME Awareness & Business Development’ कार्यशाळा येत्या रविवार, १२ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता शहरातील नेहरू चौक परिसरातील मेट्रो थिएटर येथे संपन्न होणार आहे.

तज्ज्ञांचे मिळणार थेट मार्गदर्शन :
या कार्यशाळेत अहमदाबाद येथील MSME क्षेत्रातील प्रख्यात तज्ज्ञ आणि मार्गदर्शक निरंजनजी जैन हे उपस्थित राहून उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. केंद्र व राज्य सरकारच्या विविध उद्योग योजना, MSME लोन आणि त्यावरील आर्थिक संधी यावर ते सविस्तर प्रकाश टाकणार आहेत. आजच्या स्पर्धात्मक युगात व्यवसाय कसा वाढवावा आणि त्याचे व्यवस्थापन कसे करावे, याचे कौशल्य या माध्यमातून शिकायला मिळणार आहे.

महत्त्वाच्या विषयांवर होणार चर्चा :
कार्यशाळेत प्रामुख्याने उद्योजकांसाठी आवश्यक असलेल्या ‘उद्यम’ (UDYAM) रजिस्ट्रेशनचे फायदे, सरकारी सबसिडी, तसेच व्यवसायाला जागतिक स्तरावर नेण्यासाठी GEM आणि MSME Global Mart या प्लॅटफॉर्मचा वापर कसा करावा, यावर सखोल मार्गदर्शन केले जाईल.

नियोजन आणि उपस्थिती :
जैन संघटनेचे राज्य उपाध्यक्ष विनय पारख, राज्य सदस्य अशोक श्रीश्रीमाल यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष अजय राखेचा आणि कल्पना नाहटा व संपूर्ण जैन संघटनेचे पदाधिकारी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेत आहे.

नि:शुल्क नोंदणी आणि आवाहन :
ही कार्यशाळा पूर्णतः नि:शुल्क असून, जास्तीत जास्त नवउद्योजकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी ७७८२८२०७०७ या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन आपली नोंदणी निश्चित करावी. रविवारी सकाळी १० ते १२ या वेळेत ही कार्यशाळा होणार असल्याने, वेळेचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.


Protected Content

Play sound