जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील रिंग रोडवरील पी.एन.गाळगीळ यांच्या दालनातून अज्ञात महिलेने १ लाख ४० हजार रूपये किंमतीची सोन्याची अंगठी चोरून नेल्याची धक्कादायक घटना २७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता घडली आहे. याबाबत शनिवारी १ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेचार वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव शहरातील पी.एन. गाळगीळ यांचे सोन्याचे दालन आहे. २७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास एक महिलेने या दालनातून अंदोज ११ ग्रॅम वजनाचे १ लाख ४० हजार रूपये किंमतीची सोन्याची अंगठी चोरून नेली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर शोरूममध्ये काम करणारे मॅनेजर गिरीश डेरे यांनी याबाबत शनिवारी १ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेचार वाजता तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात महिलेवर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस नाईक सुवर्णा तायडे हे करीत आहे.




