पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चालत्या बसमधुन प्रवाशी महिलेच्या गळ्यातील ६६ हजार रूपये किंमतीची सोन्याची मंगलपोत अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ललीता कैलास काळे (वय-५१) रा. कळवण जि. नाशिक या महिला शेदुर्णी ते जामनेर दरम्यान ९ जुलै रोजी दुपारी १ ते १.३० वाजेच्या सुमारास बसने येत होत्या. त्यावेळी बसप्रवासात अज्ञात चोरट्यांने त्यांच्या गळ्यातील ६६ हजार रूपये किंमतीची सोन्याची पोत चोरून नेली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी पहूर येथे बसस्थानकात उतरल्यानंतर त्यांनी पहूर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून सोमवारी १० जुलै रोजी रात्री ८ वाजता पहूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक फौजदार रविंद्र देशमुख करीत आहे.