तरूणाच्या घरातून ६७ हजार रूपये किंमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील उस्मानिया पार्क परिसरात राहणाऱ्या ३१ वर्षीय तरूणाच्या घराच्या गॅलरीच्या खिडक्या तोडून आत प्रवेश करत घरातून ६७ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना शनिवारी १८ मे रोजी मध्यरात्री अडीच वाजता घडली आहे. याप्रकरणी दुपारी ३ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील उस्मानियॉ पार्क परिसरात अब्दुल करीम अब्दुल रेहमान वय ३१ हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. पेंटींगचे कामे करून तो आपला उदरनिर्वाह करतो. शनिवारी १८ मे रोजी मध्यरात्री अडीच वाजता घरातील सर्वजण झोपलेले असता अज्ञात चोरट्यांने तरूणाच्या घराच्या गॅलरीतील खिडकी तोडून घरात प्रवेश करत घरातून ६७ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. हा प्रकार उघडकीला आल्यानंतर तरूणाने जळगाव शहर पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून दुपारी ३ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ भास्कर ठाकरे हे करीत आहे.

Protected Content