धरणगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील पथराड गावात राहणाऱ्या एका वृध्द महिलेच्या घरातून सोन्याचे व चांदीचे दागिने असा एकुण २१ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना १८ मार्च रोजी सकाळी ९.३० वाजता उघडकीला आला आहे. याप्रकरणी बुधवारी १९ मार्च रोजी दुपारी दीड वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील पथराड गावात ज्योती गणपतराव साळुंखे (वय ६१) या वृध्द महिला आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहेत. १७ मार्च आणि १८ मार्च च्या दरम्यान घरात कुणीही नसल्याचा गैरफायदा घेत घरात प्रवेश करत घरातून सोन्याचे दागिने, चांदीचे ब्रेसलेट असा एकुण २१ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. हा प्रकार मंगळवारी १८ मार्च रोजी सकाळी ९.३० वाजता समोर आला. याप्रकरणी ज्योती साळुंखे यांनी धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एएसआय सुनील लोहार हे करीत आहे.



