
पाळधी.ता.धरणगाव (वार्ताहर) राज्याचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील हे मतदान करण्यासाठी चक्क रिक्षातून मतदान केंद्रावर पोहचले. आज सकाळी पाळधी येथे त्यांनी आपला मतदानाचा हक्क बाजावला.
पाळधी येथील मतदान केंद्रावर ना.गुलाबराव पाटील हे अगदी सर्व सामन्य मतदाराप्रमाणे मतदान केंद्रावर पोहचले. रांगेत उभे राहत त्यांनी बडेजावपणा टाळला. यावेळी त्यांच्यासोबत इतर शिवसैनिकांनीही मतदान केले. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात आज (मंगळवारी) राज्यातील १४ मतदारसंघांमध्ये मतदानाला सुरुवात झाली आहे. जळगाव जिल्हात सर्व मतदान केंद्रावर सकाळी आधी माॅकपोल घेण्यात आला. त्यानंतर 7 वाजेपासून मतदानास सर्वत्र शांततेत सुरू आहे.
