Home क्रीडा फुटबॉल क्रीडा स्पर्धेत गोदावरी तंत्रनिकेतनच्या संघाला विजेतेपद

फुटबॉल क्रीडा स्पर्धेत गोदावरी तंत्रनिकेतनच्या संघाला विजेतेपद


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आईडीएसएसएच्या एफ-झोन अंतर्गत गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात नुकत्याच झालेल्या फुटबॉल क्रीडा स्पर्धेत जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातून ८ संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेत गोदावरील तंत्रनिकेनच्या संघाला विजेतेपद मिळाले आहे.

स्पर्धेचे उद्घाटन शासकीय तंत्रनिकेतनच्या प्राचार्य डॉ. पराग एम पाटील, गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, तंत्रनिकेतन समन्वयक प्रा. दीपक झांबरे, शारीरिक शिक्षण संचालक डॉ. आसिफ खान, तसेच सर्व संघांचे संघ व्यवस्थापक यांच्या उपस्थितीत करण्यात आले. अंतिम सामन्यात गोदावरी तंत्रनिकेतनच्या संघाने जामिया पॉलिटेक्निक अक्कलकुवा संघाला ३-२ गोलांनी हरवून विजेतेपद पटकावले. या यशामध्ये शारीरिक शिक्षण संचालक डॉ. आसिफ खान यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले.

या क्रीडा स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी गोदावरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, तंत्रनिकेतन समन्वयक प्रा. दीपक झांबरे, शारीरिक शिक्षण संचालक डॉ. आसिफ खान, कार्यक्रम समन्वयक प्रा. चंद्रकांत शिंपी व प्रा. दीपेश भुसे तसेच संपूर्ण शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, आणि डॉ. केतकी पाटील यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक आणि अभिनंदन केले आहे. स्पर्धेचे पंच म्हणून प्रा. विजय निकम, प्रा. पंकज तिवारी, प्रा. वसीम शेख, तौसिफ खान, सादिक अली यांनी काम पाहिले.


Protected Content

Play sound