जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | गोदावरी फाऊडेशन संचलित, गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात सर्व शाखांच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी न्युडेसिम अम्बेसेडर्स – आयबीएम (खइच) या नामांकित कंपनीच्या ऑनलाईन कॅम्पस ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले होते.
न्युडेसिम अॅम्बेसेडर्स यांच्या माध्यमातुन ऑनलाईन कॅम्पस मध्ये महाविद्यालयाच्या ११५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोदविला.
त्यात सर्व प्रथम पहिल्या फेरीमध्ये विद्यार्थ्यांची ऑनलाईन टेस्ट घेण्यात आली असून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी दुसर्या फेरीमध्ये तांत्रिक चर्चा घेण्यात आली. यात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा तीसर्या फेरी मध्ये एचआर राऊंड घेण्यात आला. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना न्युडेसिम अम्बेसेडर्स – आयबीएम (खइच) कंपनी मार्फत वार्षिक ४.६ लाखाचे पॅकेज देण्यात येणार आहे.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजयकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली संगणक विभागाचे प्रमुख प्रा.प्रमोद गोसावी व इतर प्राध्यापक वृंद यांनी परिश्रम घेतले.