गोदावरी इंग्लिश मिडीयम स्कूलच्या खेळाडुंची राष्ट्रीय फुटसॉल स्पर्धेसाठी निवड

जळगाव प्रतिनिधी । राष्ट्रीय फुटसॉल स्पर्धेसाठी नुकतीच पुण्यात निवड चाचणी झाली असून त्यातून महाराष्ट्र संघात गोदावरी इंग्लिश मिडीयम स्कूलमधील पियुष धांडे आणि अंशुमन इंगळे या खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. येत्या ९ ते १२ ऑक्टोबर दरम्यान तामिळनाडू राज्यातील धर्मापुरी येथे ही स्पर्धा होणार आहे.

पुणे येथे ३ ऑक्टोबर रोजी निवड चाचणी घेण्यात आली. यात महाराष्ट्रातील ७५ खेळाडू सहभागी झाले होते. त्यातून ६ ऑक्टोबर रोजी फुटसॉल असोसिएशन ऑफ महाराष्ट्रासाठी संघाची निवड करण्यात आली आहे. त्यात गोदावरी इंग्लिश मिडीयम स्कूलमधील पियुष राजेंद्र धांडे आणि अंशुमन मनोज इंगळे यांची निवड करण्यात आली आहे. जळगाव येथील गोदावरी स्कूलचे विद्यार्थी तामिळनाडू राज्यात आयोजित राष्ट्रीय फुटसॉल स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणार आहे. निवड झाल्याबद्दल गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, माजी आमदार चंद्रकांत सोनवणे, गोदावरी फाऊंडेशनच्या सचिव डॉ.वर्षा पाटील, डॉ केतकी पाटील, प्राचार्या निलीमा चौधरी यांनी खेळाडुंचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या. दोनही खेळाडुंना प्रा.आसिफ खान व सत्यनारायण पवार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

 

 

Protected Content