जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव येथील गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगने बीएस्सी प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या नवागतांचे स्वागत मोठया धुमधडाक्यात करण्यात आले विद्यार्थ्यांसाठी इंडक्शन कम ओरींएन्टेशन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाचे उदघाटन प्राचार्य विशाखा गणविर यांचे हस्ते दिपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी प्रशासन अधिकारी प्रविण कोल्हे, प्रा. निम्मी वर्गीस,प्रा सुमैया शेख, प्रा. प्रशिक चव्हाण,प्रा. स्वाती गाडेगोणे, प्रा. अश्लेषा मून, प्रा. स्मीता उभाळे, प्रा. अभिजित राठोड, प्रा शरद आडे, सह प्राध्यापक उपस्थीत होते.मान्यवरांचा सत्कार पुष्पगुच्छ देवून करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करतांना प्राचार्य विशाखा गणविर यांनी महाविद्यालयाचे नियम व शैक्षणिक अभ्यासक्रमाविषयी माहिती देत अभ्यासक्रम व उपक्रमात सहभागासाठी प्रोत्साहन दिले.
प्रा. निम्मी वर्गीस यांनी संस्था परिचय करून दिला. यानंतर प्रत्येक विभागाच्या प्रमुखांनी प्राध्यापक परिचय व माहिती दिली. प्रा राठोड यांनी नर्सिंगमधील संधी व वाटा विषद केल्यात तर माजी विदयाथ्यार्ंनी देखिल अनूभव कथन केले. यावेळी नवीन आलेल्या विदयार्थ्यांनी देखिल परिचय करून दिला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा स्मीता उभाळे तर आभार प्रा अश्लेषा मून यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी समन्वयक प्रा निम्मी वर्गीस यांच्या मार्गदर्शनानुसार बीएस्सी प्रथम वर्षाचे विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.