जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गोदावरी फाउंडेशन संचलीत गोदावरी इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च जळगाव महाविद्यालयाची आज जैन फार्म फ्रेश फुड्स लिमिटेड या कंपनीमध्ये औद्योगिक भेट (Industrial Visit) देण्यात आली.
शैक्षणिक क्षेत्रात औद्योगिक भेट महत्वाची आहे. शिक्षण घेत असताना पुस्तकी ज्ञानासोबत कंपनी मध्ये काम कसे चालते याचा अनुभव असणे महत्वाचा आहे त्या उद्देशानेच Industrial Visit घेतली जाते. यावेळी जैन व्हॅली कंपनीत फूड प्रोसेसिंग प्लांट मध्ये केळी, आंबा इत्यादी फळांवर प्रोसेसींग कशी केली जाते, पल्प कसा तयार केला हे बघितले. सोलर प्लांट मध्ये सोलर पॅनल, सोलर वॉटर पॅनल इत्यादी कसे बनवतात हे बघितले.
यावेळी विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारून माहिती मिळविली. या औद्योगिक भेटीस महाविद्यालयाचे २०० विद्यार्थी उपस्थित होते. सदर industrial visit साठी जैन व्हॅलीचे पी. एस.नाईक, जी.आर. पाटील, एस . बी. ठाकरे यांचे सहकार्य लाभले.