जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गोदावरी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील आणि सुभाष पाटील यांच्या मातोश्री गोदावरी आई पाटील यांचे यांचे ९१ व्या वर्षी आज बुधवारी ३ सप्टेंबर रोजी दुपारी १.३४ वाजता वृध्दापकाळाने निधन झाले आहे.
शांत, संयमी व प्रेमळ स्वभाव
गोदावरी आई त्यांच्या शांत, संयमी आणि प्रेमळ स्वभावासाठी ओळखल्या जात होत्या. त्यांच्या संस्कारांनी आणि मार्गदर्शनाने डॉ. उल्हास पाटील यांना जीवनात प्रेरणा मिळाली. त्यांनी कुटुंब आणि समाजासाठी दिलेल्या योगदानामुळे त्या सदैव स्मरणात राहतील. त्यांच्या अचानक जाण्याने गोदावरी परिवार आणि त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

कुटुंबावर शोककळा
गोदावरी आईंच्या निधनाने डॉ. उल्हास पाटील, सुभाष पाटील आणि प्रमिलाताई यांच्यासह संपूर्ण गोदावरी परिवारावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या दु:खात लाईव्ह ट्रेंडस न्यूज आणि परिवार सहभागी आहे. आपल्या पाठीशी असलेल्या माउलीचा हात अचानक निघून जाणे हे कोणत्याही लेकरासाठी अत्यंत वेदनादायी असते. ईश्वर त्यांच्या पुण्यात्म्यास शांती देवो, आणि पाटील परिवाराला हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, अशी प्रार्थना सर्व स्तरातून व्यक्त होत आहे.
त्यांचे पार्थिव आज रात्रीपासून उद्या सकाळपर्यंत अंतिम दर्शनासाठी गोदावरी हॉस्पिटल, भास्कर मार्केट, जळगाव येथे ठेवण्यात येणार आहे. त्यांच्यावर उद्या, सकाळी ११ वाजता डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज, जळगाव येथे अंतिम संस्कार केले जातील.



