जळगाव -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।शहरातील मास्टर कॉलनी परिसरातून दुचाकीवरून बकऱ्यांची चोरी करणाऱ्या दोन संशयित आरोपींना बुधवारी १८ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजता भुसावळ शहरातील खडका रोड येथून अटक करण्यात एमआयडीसी पोलिसांना यश आले आहे. अटकेतील संशयीतांना न्यायालयाने २१ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
खलील खान मुशीर खान (वय ४७) आणि मुसा खान रशीद खान (वय ६२, दोघ रा. खडका रोड भुसावळ) असे अटक केलेल्या संशयित आरोपींचे नाव आहे.
शहरातील मास्टर कॉलनीत आसिफ आरीफ कुरेशी हा तरुण वास्तव्यास आहे. बुधवारी १८ ऑक्टोबर रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घरासमोर बांधलेल्या बकऱ्या दुचाकीवरुन आलेल्या दोन चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली. यापूर्वी देखील याच परिसरातून चार ते पाच बकऱ्या चोरी झाल्याचा घटना घडल्या होत्या. ही चोरी भुसावळ येथील खलील खान व मुसा खान हे दोघ चोरटे करीत असल्याची माहिती मिळताच त्यांना एमआयडीसी पोलिसांनी भुसावळ शहरातील खडका रोड परिसरातून बुधवारी १८ ऑक्टोबर रोजी रात्री दहा वाजता ताब्यात घेतले. त्यांना खाक्या दाखविताच त्यांनी आपणच गुन्हा केल्याचे कबुल केले. दोघ संशयितांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली. सरकारतर्फे ॲड. निखिल कुलकर्णी यांनी कामकाज पाहिले.
ही कारवाई पोलीस निरीक्षक जयपाल हिर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, इमरान सय्यद, किशोर पाटील, निलोफर सय्यद, गणेश शिरसाळे, सचिन पाटील, योगेश बारी, राहुल रगडे, किरण पाटील, साईनाथ मुंडे यांच्या पथकाने केली.