जळगाव, प्रतिनिधी | जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त जिल्ह्यातील कुटुंब नियोजन कार्यक्रमात सर्वोत्कृष्ट काम करणारे अधिकारी व कर्मचारी यांचा गुणगौरव कार्यक्रमाचे आयोजन आज २९ ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रमात कार्य सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्षा उज्वला पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील तसेच आरोग्य सभापती दिलीप पाटील उपस्थित होते. याप्रसंगी व्यासपीठावर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गायकवाड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पोटोडे, जिल्हा आरसीएच अधिकारी डॉ. समाधान वाघ, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद पांढरे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. जयवंत मोरे, साहाय्यक संचालक कुष्ठरोग इरफान तडवी, डॉ. देवराम लांडे, डॉ. फिरोज शेख, डॉ. शिवराय पाटील, डॉ. लासूरकर, डॉ. संगीता दवंगे, डॉ. राजेश सोनवणे, डॉ. हेमंत बर्हाटे, डॉ. बाळासाहेब कांबळे आदी उपस्थित होते . प्रास्ताविक डॉ. दिलीप पाटोळे यांनी केले. अध्यक्षीय भाषणात मुलींचा घटता जन्मदर वाढती लोकसंख्या नियंत्रण तसेच कुटुंब कल्याण कार्यक्रमाची व्यापक प्रसिद्धी बाबत मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमात राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रमात उत्कृष्ट काम करणारे प्रथम तीन तालुका वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहाय्यक, सहाय्यिका, आरोग्य सेवक सेविका, अशा कर्मचारी यांचा गुणगौरव सोहळा साजरा करण्यात आला. यावर्षी कार्यक्रमाचे घोषवाक्य ‘कुटुंब नियोजन करून स्वीकारा जबाबदारी, आई व बाळाच्या संपूर्ण आरोग्याचीही ही तयारी’ असे आहे. सूत्रसंचालन डॉ. राजेश सोनवणे यांनी केले. यशस्वितेसाठी अजय चौधरी, प्रकाश राठोड, विद्या पाटील, विद्या राजपूत, बापू वाघ, बी.टी. सूर्यवंशी, मिलिंद लोणारी, जयश्री चौधरी यांनी कामकाज पाहिले.