भुसावळ प्रतिनिधी । राष्ट्रीय महामार्गावर वाहन थांबवून वाहनधारकांची लुटमार करणाऱ्या टोळीला भुसावळ बाजारपेठ पोलीसांनी अटक केली आहे.
भरत तिवारी (26) रा. तापीनगर भुसावळ, अक्षय शामकांत कुलकर्णी (23) रा. नारायण नगर आणि आवेश शेख बिस्मिल्ला (20) रा. जिया कॉलनी भुसावळ आणि मुज्जीमल शेख कलिम (19) रा. भुसावळ अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
राष्ट्रीय महामार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास भुसावळ जवळील 5 जण वाहने अडवून लुटमारी करत असल्याची माहिती भुसावळ बाजारपेठ पोलीसांना माहिती मिळाली. पोलीस निरीक्षक दिलीप भागवत व बाबासाहेब ठोंबे यांच्या पथकाने चौघांना शिताफीने अटक केली. चौघांवर भुसावळ बाजार पेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.