पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । धरणगावात ६ वर्षीय बालिकेवर एका नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणातील नराधमास तात्काळ कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी पाचोरा तेली समाजातर्फे पोलिस स्टेशन व स्थानिक प्रशासनास निवेदनाव्दारे करण्यात आली.
सदरचा प्रकार २० फेब्रुवारी रोजी घृणास्पद व माणुसकीला काळीमा फासणारा असून या निंदनीय घटनेच्या निषेधार्थ व आरोपीस तात्काळ कठोरात कठोर शासन व्हावे, या मागणीसाठी पाचोरा शहर तेली समाज मंडळ तथा पाचोरा तालुका तैलिक समाज महासभा यांच्यातर्फे आज दि. २३ फेब्रुवारी रोजी पाचोरा पोलिस स्टेशन, उपविभागीय अधिकारी कार्यालय व तहसिल कार्यालयात निवेदन देण्यात आले.
निवेदन देते वेळी पाचोरा तेली समाज तालुका अध्यक्ष नारायण चौधरी, उपाध्यक्ष उत्तम चौधरी, सचिव शांताराम चौधरी, सहसचिव शरद चौधरी, विश्वस्त सतिष चौधरी, ज्ञानेश्वर चौधरी, प्रकाश चौधरी, बापु चौधरी, मोतीलाल चौधरी, संजय चौधरी सह मोठ्या संख्येने पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.