पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । खुन्नस देण्याच्या कारणावरून बाहेरपूर येथील एका तरूणाची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणात एकाला अटक करण्यात आली आहे. दरम्यान अटक केलेल्या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी श्री क्षत्रिय फुल माळी समाजातर्फे प्रांताधिकारी भुषण अहिरे व पोलिस निरीक्षक अशोक पवार यांना देण्यात आले आहे.
पाचोरा शहरातील बाहेरपुरा येथे १८ फेब्रुवारीचे मध्यरात्री हेमंत सोनवणे (वय – २० वर्ष) याचा रोहित लोणारी याने पोटात चाकु खुपसून खुन केल्याची घटना घडली होती. हेमंत सोनवणे यास तात्काळ पाचोरा खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता त्याची प्रकृती खालावत असतांना हेमंत यास जळगाव येथे उपचारार्थ हलविण्यात आले होते. मात्र हेमंत याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. घटनेच्या तासाभरात पोलिसांनी रोहीत लोणारी यास जेरबंद केले आहे. रोहीत लोणारी यास कठोर कलमाखाली शिक्षा व्हावी, अशा आशयाचे निवेदन येथील श्री क्षत्रिय फुल माळी समाजातर्फे प्रांताधिकारी भुषण अहिरे व पोलिस निरीक्षक अशोक पवार यांना देण्यात आले आहे.
निवेदन देते प्रसंगी, सुनिल महाजन, सतिष महाजन, अॅड. भाग्यश्री महाजन, राहुल महाजन, चिंधु मोकळ, गोरख महाजन, अशोक महाजन, मयुर महाजन, गोपाल सुर्यवंशी, कन्हैया देवरे, शुभम महाजन, शरद गिते, संजय महाजन, रितेश वाणी, शाम महाजन, रोहित महाजन, नथ्थु महाजन, सुदर्शन महाजन, सुधाकर महाजन, विकास महाजन, गजानन काकडे, विजय महाजन, सुरेश महाजन, निलेश सोनवणे यांचेसह मोठ्या संख्येने श्री क्षत्रिय फुल माळी समाज बांधव उपस्थित होते. रोहीत लोणारी याचे वर कठोर कारवाई न झाल्यास आत्मदहनाचा इशारा हेमंत सोनवणे याच्या परिवाराने दिला आहे.