जळगाव, प्रतिनिधी । लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने जिल्हा एनएसयुआयतर्फे नेरी नाका येथील श्री अण्णाभाऊ साठे स्मारकाला पुष्पहार व पूल पुष्प वाहून अभिवादन करण्यात आले. दरम्यान, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न किताब देण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी केली आहे.
लोकशाहीर व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न किताब देण्यात यावा व त्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा अशा प्रकारची मागणी जळगाव जिल्हा एनएसयुआयच्या वतीने जिल्हा अध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी जिल्हा अधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी केली लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी वर्षाची सांगता येत्या एक ऑगस्ट 2020 रोजी होणार आहे. मागास समाजामधून पुढे आलेल्या व समाजाच्या व्यथा वेदना आपल्या साहित्यकृतीतून प्रखरपणे मांडून त्यासाठी लढा देणाऱ्या प्रतिभावंत अण्णाभाऊ साठे यांचे कार्य महाराष्ट्र कधीही विसरणार नाही. संयुक्त महाराष्ट्राच्या नवनिर्मितीसाठी अण्णाभाऊ साठे यांचे योगदान मोलाचे सन 1942 साली स्वातंत्र्यलढ्याच्या चळवळीत सहभागी झाल्याबद्दल ब्रिटिश सरकारने अण्णाभाऊ साठे यांच्या विरोधात पकड वारंट जाहीर केलं. तेथून सुटका करून मुंबई येथे आल्यानंतर अण्णाभाऊ साठे यांनी समाजातील दुःखी अन्यायग्रस्त लोकांसाठी प्रखरपणे विविध साहित्यकृतींमधून त्यांच्या भावना मांडल्या व त्यांच्यासाठी लढले : 35 कादंबऱ्या, 20 कथासंग्रह दहा प्रसिद्ध पोवाडे असंख्य शाहिरी लोकनाट्य लोककथा असे असंख्य विविध साहित्य श्री अण्णाभाऊ साठे यांचे प्रसिद्ध झाले. या थोर समाज सुधारकांना मरणोत्तर भारतरत्न किताब देऊन राज्य शासनाने त्यांच्या कार्याचा गौरव करावा व हीच खरी आदरांजली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. याप्रसंगी अल्पसंख्यांक शहराध्यक्ष अमजद पठाण, युवक काँग्रेस शहराध्यक्ष मुजीब पटेल, प्रदेश प्रतिनिधी ज्ञानेश्वर कोळी, अनुसूचित जाती विभाग मनोज सोनवणे, वासुदेव महाजन, उद्धव वाणी, आदी पदाधिकारी उपस्थित होते.