अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर नगरपालिकेच्या सहकार्याने शहरात१० मार्चला परीपत्रकात्रानुसार विविध ठिकाणी पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. तरी आपले शून्य ते पाच वयोगटातील सर्व बालकांना पोलिओ लसीकरण करून पोलिओचा समूळ नायनाट करण्याच्या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन डॉक्टर विलास महाजन यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.
सध्या भारतात पोलिओ लस न दिल्याने अनेक बालके दिव्यांग झालेले आहेत. या आजाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी अंमळनेर शहरात लोकनियुक्त नगराध्यक्ष पुष्पलता साहेबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील डॉक्टरांशी सल्लामसलत करून पोलिओ जनजागृती मोहीम दहा मार्च पासून राबविण्यात येणार आहे. तरी या मोहिमेत पालकांनी आपल्या 0 ते 5 वयोगटातील बालकांना पोलिओ लसीकरण करून पोलिओचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन डॉ विलास महाजन यांनी केले आहे.