चाळीसगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | दिल्लीत झालेल्या श्रद्धा वालकर यांच्या हत्याप्रकरणी चाळीसगावात विश्व् हिंदू परिषदेसह विविध सामाजिक संघटना आक्रमक झाली असून मारेकऱ्याला भरचौकात फाशीची शिक्षा द्यायला हवी अशी मागणी आज निवेदनाद्वारे केली आहे.
श्रद्धा हत्याकांडमधील मुख्य आरोपी आफताब व श्रद्धाची मुंबईच्या कॉल सेंटरमध्ये मैत्री झाली. त्यानंतर त्याचे रूपांतर प्रेमात झाले. घरच्यांनी विरोध दर्शविल्यावर ते दिल्लीला पळून गेले. परंतु एके दिवशी त्यांच्यात भांडण झाले. यातून अफताबाने श्रद्धाचे ३५ तुकडे करून विविध भागात फेकून दिले. संपूर्ण जगाला हादरून सोडणारी हि थरारक घटना दिल्लीतील मेहरौली परिसरात घडली आहे. याप्रकरणी आफताब पुनावाला या मुख्य आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. मात्र या घटनेने देश पेटून उठला आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून आफताबला भरचौकात फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी होत आहे. याच पाश्वभूमीवर चाळीसगावात गुरुवार रोजी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांच्यासह विविध सामाजिक संघटनांनी चाळीसगाव तहसील गाठून मारेकऱ्याची केस फास्टट्रॅक मध्ये चालवून तातडीने आफताबला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली. तत्पूर्वी यावेळी विविध घोषणेबाजीने परिसर दणाणून गेला. निवेदनात महाराष्ट्र राज्यातील मराठी-हिंदू भगिनी श्रद्धाची निर्गुण हत्या करण्यात आली. तिचा सहकारी आफताब पुनावाला याने जिहादी मानसिकतेतून केली असून परस्पर विरोधी धार्मिक नीती मूल्ये असलेल्या मुला-मुलींचे विवाह होण्यास प्रतिबंध असलेला कायदा संसदेत पारित करावा आदी मागणी करण्यात आली आहे.