चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील वडाळा वडाळी येथे रेल्वे भुयारी मार्गाचे काम सुरू असल्याने शेतकर्यांना अडचणी होत असून पर्यायी रस्ता न मिळाल्यास थेट रेल्वे रोको करणार असल्याचा इशारा आज निवेदनातून देण्यात आला.
चाळीसगाव तालुक्यातील वडाळा वडाळी या ठिकाणी रेल्वे भुयारी मार्ग बोगद्याचे काम बर्याच दिवसांपासून सुरू आहे. यामुळे आधीच या परिसरातील शेतकर्यांना अडचणी होत आहे. त्यातच आता पावसाळा तोंडावर असल्यामुळे त्या परिसरा मधे शेती असलेल्या शेतकरी बांधवांना पावसाळ्यात शेती साठी बैल गाडी व पायी जाने अवघड होणार आहे.
या अनुषंगाने परिसरातील शेतकर्यांसाठी रेल्वे प्रशासनाने पर्यायी रस्ता उपलब्ध करून द्यावा असे मागणी होत आहे. याच मागणीचे निवेदन चाळीसगाव येथील रेल्वे अधिकारी एडी आय वाडेकर यांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात दोन दिवसांत पर्यायी मार्ग रस्ता उपलब्ध नाही केला तर आम्ही समस्त वडाळा वडाळी शेतकरी बांधव रेल्वे रोको आंदोलन करु असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. याप्रसंगी विकास आमले,सुशील आमले, समाधान आमले, दत्तू आमले, सुनील आमले, शेखर देवरे आदी शेतकरी बांधव उपस्थित होते.