Home Cities अमळनेर गिरीष वाणी सरांचे जीवन शिक्षकांसाठी समर्पित – गुणवंतराव पाटील

गिरीष वाणी सरांचे जीवन शिक्षकांसाठी समर्पित – गुणवंतराव पाटील



अमळनेर (प्रतिनिधी) गिरीष वाणी सरांचे जीवन शिक्षकांसाठीच समर्पित असून ते शांत संयमी व सौजन्यमुर्ती मितभाषी आहेत. त्यांनी गटसाधन केंद्रात दिलेली सेवा व योगदान खुप महत्वपूर्ण आहे. वाणी सरांनी यासाठी घेतलेली मेहनत व परीश्रम अनमोल असल्याचे प्रतिपादन गुणवंतराव पाटील यांनी केले. ते शेळावे या ठिकाणी बदली बाबत मार्गदर्शन व माहिती तपासणी बाबत आयोजित कार्यशाळेत बोलत होते.

 

केंद्रशाळा शेळावे या ठिकाणी बदली बाबत मार्गदर्शन व माहिती तपासणी बाबत कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमात दगडी सबगव्हाण शाळेचे मुख्याध्यापक गिरीष वाणी यांचा वाढदिवसही केंद्रातील सर्व मुख्याध्यापक व शिक्षक बंधु बघिनींकडुन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी रामेश्वर भदाणे खेडीढोक,मनवंतराव साळुंखे धाबे, दिलीप ठाकरे व श्रीमती प्रतिभा पाटील दगडी सबगव्हाण, गुणवंतराव पाटील धाबे यांनी गिरीष वाणी सरांचा जीवन परिचय दिला. यावेळी माजी ग.स. संचालक व्ही एम पाटील यांनीही उपस्थिती देवुन त्यांचे अभिष्टचिंतन केले. रामेश्वर भदाणे यांनी सुत्रसंचलन केले. या वेळी गिरीष वाणी यांनी सर्वांचे आभार मानून जीवनभर माझे काम कर्तव्य प्रामाणिकपणे व निष्ठेने करीत राहिल,अशा भावना व्यक्त केल्यात.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound