Home राजकीय भाजपच्या वाटचालीत जेटलींचा मोलाचा वाटा- ना. गिरीश महाजन

भाजपच्या वाटचालीत जेटलींचा मोलाचा वाटा- ना. गिरीश महाजन

0
46

जळगाव प्रतिनिधी । भारतीय जनता पक्षाच्या आजवरच्या वाटचालीत अरूण जेटली यांचा मोलाचा वाटा असल्याचे नमूद करत जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन यांनी त्यांना आदरांजली अर्पण केली.

माजी केंद्रीय मंत्री अरूण जेटली यांच्या निधनानंतर ना. गिरीश महाजन यांनी संवेदना व्यक्त केली आहे. या संदर्भात प्रसारमाध्यमांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ स्वयंसेवक व देशाच्या राजकारणातील अग्रगण्य व्यक्तिमहत्व भाजपचे राष्ट्रीय नेते माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या निधनाने पक्षाचेच नव्हे तर देशाचे नुकसान झाले आहे. देशाच्या अर्थकारणाला बळ देणारे महानायक म्हणून जेटली यांनी ऐतिहासिक घोषणा केल्या व त्या अंमलात आणल्या आहेत. यामुळे देशातील औद्योगिक प्रगतीला वेग आला. त्यांच्या केंद्रीय मंत्री पदाच्या कार्यकाळात घेतलेले निर्णय देशाला विकासात्मक फायदा होत असल्याचे नमूद करत जलसंपदा व वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. गिरीश महाजन यांनी त्यांना आदरांजली व्यक्त केली आहे.


Protected Content

Play sound