मोठी बातमी : शहीद जवानाला मानवंदना देतांना गिरीश महाजन जखमी

वरणगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहीद जवान अर्जुन लक्ष्मण बाविस्कर यांना मानवंदना देण्यासाठी आज जलसंपदा मंत्री गिरीश महाजन वरणगावात दाखल झाले. शहीदाच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी ते मिलिट्री ट्रकवर चढले, परंतु ट्रकच्या वरच्या रॉडचा मार डोक्याला लागल्याने रक्तस्राव झाला आणि त्यांना चक्कर आली. तरीही, त्यांनी थांबता शहीदाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.
 
मानवंदना देताना मंत्री महाजन किरकोळ जखमी
शहीद जवान अर्जुन बाविस्कर यांच्या अंतिम दर्शनासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन वरणगाव येथे दाखल झाले. त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करण्यासाठी मिलिटरी ट्रकवर चढताना मंत्री महाजन यांच्या डोक्याला लोखंडी रॉड जोरात आदळला, त्यामुळे त्यांच्या डोक्यातून रक्तस्त्राव सुरू झाला. क्षणभर त्यांना चक्करही आली, मात्र त्यांनी धीर राखत शहीद जवानाला अभिवादन केले.
या दुर्दैवी घटनेमुळे वरणगाव शहरावर शोककळा पसरली होती. हजारो नागरिक, लष्करी अधिकारी, राजकीय नेते आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत शहीद जवानाला अंतिम निरोप देण्यात आला. पार्थिवदर्शनावेळी भावनिक वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांनी “भारत माता की जय” आणि “शहीद जवान अमर रहे” अशा घोषणा देत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
जखमी अवस्थेतही मंत्री महाजन कर्तव्यावर ठाम
लोखंडी रॉड लागल्याने मंत्री गिरीश महाजन यांना जोरदार मार बसला होता, त्यातून रक्तस्राव होत होता. उपस्थित पदाधिकाऱ्यांनी त्यांना तातडीने निमजाय हॉस्पिटलमध्ये दाखल केले, जिथे डॉ. निलेश पाटील यांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले. डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला, मात्र महाजन यांनी तो नाकारला आणि अंत्ययात्रेत सहभागी झाले.
शहीद जवानाच्या कुटुंबाला दिले सांत्वन
जखमी अवस्थेतही मंत्री गिरीश महाजन यांनी शहीद जवान अर्जुन बाविस्कर यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांनी कुटुंबीयांना धीर देत सांगितले की, “देशासाठी अर्जुनने बलिदान दिले आहे, आम्ही त्याच्या कुटुंबासोबत आहोत. राज्य सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील.”
तिरंगा सर्कलवर अंतिम मानवंदना
मंत्री महाजन यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याला न जुमानता, अंत्ययात्रेत तिरंगा सर्कलपर्यंत पायी प्रवास केला आणि हजारो उपस्थित नागरिकांसह शहीद जवानाला अंतिम मानवंदना दिली. यानंतर, त्यांनी तातडीने नाशिकला महत्त्वाच्या बैठकीसाठी प्रयाण केले.

Protected Content