जामनेर, प्रतिनिधी | जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आज आपला उमेदवारी अर्ज तहसील कार्यालयात दाखल केला.
विधानसभा निवडणुकीसाठी आज ना.गिरीष महाजन यांनी आपला भाजपा पक्षातर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शहरातून ढोलताशांचा गजरात शक्तिप्रदर्शन रॅली काढण्यात आली. तसेच यावेळी मिरवणुकीत सामील झालेल्या मतदारसंघातील कार्यकर्ते आणि इतर कट्टर विरोधकांनी ना.महाजन यांच्या उपस्थितीत भाजप पक्षात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे व उपनगराध्यक्ष जावेद इकबाल, मा.नगरसेवक मुकुंदा सुरवाडे, व राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केला. अमळनेर येथील महिला कॉंग्रेसच्या ललीता पाटील यांनी ही यावेळी भाजपात प्रवेश केला. जळगावचे आमदार सुरेश भोळे, जामनेरच्या नगराध्यक्षा साधना महाजन, उपनगराध्यक्ष अनीस शेख, गोविंद अग्रवाल, बाबूराव घोंगडे, तुकाराम निकम यांच्यासह तालूकाभरातील कार्यकर्ते, महिला व जिल्हा पातळीवरील नेते मंडळी हे उपस्थित होते.