गिग-प्लॅटफॉर्म कामगारांना ई-श्रम पोर्टलवर नोंदणीची सुविधा उपलब्ध

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भारत सरकारच्या कामगर आणि रोजगार मंत्रालयाने गिग आणि प्लॅटफॉर्म कामगारांसाठी ई-श्रम पोर्टलवर नोंदणीसाठी सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केलेल्या गिग कामगारांना विविध सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी योजनांचा लाभ देण्याचे प्रस्तावित आहे. यामुळे ओला, उबर, रॅपिडो, झोमॅटो, स्विगी, झेप्टो, ब्लिकीट, ॲमेझॉन, फ्लिपकार्ड, मिशो, यासारख्या प्लॅटफॉर्मवर बॉय, राइडर, ड्रायव्हर आणि इतर गिग कामगारांना मोटा दिलासा मिळणार आहे.


ई -श्रम पोर्टलवर नोंदणी केल्यामुळे मोफत अपघात विमा संरक्षण, सामाजिक सुरक्षा योजना लाभ, सरकारी योजनांशी थेट जोडणी, भविष्यातील कल्याणकारी योजनांमध्ये समावेश करण्यात येणार आहे. या नोंदणीव्दारे गिग, आणि प्लॅटफॉर्म कामगारांना औपचारिक ओळख मिळेल. आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी हि नोंदणी आवश्यक आहे. याकरिता नोंदणी करणाऱ्या व्यक्तीचे वय १६-५९ असावे, तो आयकर भरणारा नसावा, ईपीएफओ व ईसआयसीचा सदस्य नसावा. तसेच आधार कार्ड, आधार कार्डशी लिंक असलेले मोबाल नंबर, बँक खाते तपशील. नोंदणीसाठी आवश्यक आहेत.

गिग प्लॅटफॉर्म कामगारांना महा ई-सेवा केंद्र किंवा https://register.eshram.gov.in या लिंकवर ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे तसेच दि. ७ एप्रिल २०२५ ते १७ एप्रिल २०२५ या कालावधीत नोंदणी करण्याची सुविधा कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आली आहे. गिग आणि प्लॅटफॉर्म कामगारांनी ई-श्रम पोर्टलवरील नोंदणी मिळणाऱ्या लाभाबाबत अधिक माहितीसाठी सहाय्यक कामगार आयुक्त, जळगाव यांचे कार्यालय, पहिला मजला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्केट, जिल्हा पेठ, जळगाव येथे संपर्क साधावा. तसेच संबंधीत कामगारांनी त्यांच्या हक्काचे संरक्षण आणि उज्ज्वल भविष्यासाठी ई-श्रम पोर्टवर नोंदणी करावी, असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त, जळगाव डॉ. रा.दे. गुल्हाने यांनी केले आहे.

Protected Content