चाळीसगाव प्रतिनिधी । शहरातील 250 भाविक घोडेगाव ते शिर्डी येथे पायी दिंडीला जाण्यासाठी सहभागी झाले आहेत. या भक्तांसोबत युवानेते मंगेश चव्हाण यांनीही दोन ते तीन किलोमीटर पायी चालून वारीत सहभागी झाले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, हे सर्व भाविक ओम साईरामच्या गजरात करत सहभागी झाले होते. वारकऱ्यांना संबोधतांना युवानेते मंगेश चव्हाण म्हणाले की, अध्यात्माला विठ्ठलाची व विज्ञानाला अध्यात्माची गरज आहे. विज्ञानाला अध्यात्माची जोड मिळाली, तर आपण प्रगती करू शकतो. असे ते यावेळी म्हणाले. यासोबतच त्यांनी अध्यात्माचे जीवनातील स्थान स्पष्ट केलं. याप्रसंगी साई स्तवन मित्रमंडळ मार्गदर्शक लक्ष्मण महाराज, राठोड अनिल, राठोड अंकुश, चव्हाण ज्ञानेश्वर, राठोड शिवाजी, राठोड रवींद्र, राठोड राजेंद्र, जाधव व समस्त घोडेगाव ग्रामस्थ उपस्थितीत होते.