जळगाव प्रतिनिधी । रामानंद नगर पोलिस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या विद्युत कॉलनीत एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याच्या घरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून 20 हजार रुपये रोख चोरुन नेल्याचा प्रकार आज सकाळी 8 वाजेच्या सुमारास उघडकीस आला. याबाबत रामानंदनगर पोलिसात अज्ञात चोरट्यांनी विरोधात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रामचरण शामराव रडे (वय-70), विद्यूत कॉलनी, कोल्हे नगर हे एअरफोर्सचे सेवानिवृत्त अधिकारी आहेत. त्यांना दोन मुले असून एक पुण्यात सॉप्टवेअर कंपनीत तर दुसरा मुलगा मुंबईत यश बँकेत नोकरीला आहे. श्री. रडे अधूनमधून दोन्ही मुलांकडे येजा करत असतात. दरम्याने 10 दिवसांपुर्वी पुण्यातील मुलगा दिनानाथ रडे यांच्याकडे पत्नीसह गेले होते. ही संधी साधत अज्ञात चोरट्यांनी 13 जून रोजीच्या रात्री 1 ते सकाळी 6 वाजेच्या दरम्यान लोखंडी दरवाजाचे कडी कोयंडा कटरने तोडून घरातील लोखंडी कपाट तोडून कपाटात ठेवलेले 20 हजार रूपये रोख व विदेशी नाणे चोरून नेला.
शेजाऱ्यांमुळे प्रकार उघडकीस
आज सकाळी 6 वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे शेजारी राहणारे चौधरी बाहेर आल्यानंतर त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला. त्यांनी रडे यांना फोन करून विचारले असता ते पुण्यात असल्याचे समजले. यावरून घरात चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला. रडे यांनी भूषण कॉलनीत राहणारा भाचा नितीन आसोदेकर याला घरी जायला सांगितले व रामानंद नगर पोलीसात घटनेची माहिती देण्यात आली.