जळगाव प्रतिनिधी । महापालिकेच्या वतीने घरपट्टीत वाढ करण्यात आली आहे. या घरपट्टी विरोधात भाजप महानगरच्यावतीने महापालिकेसमोर जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली. तसेच मागण्यांचे निवदेन महापालिका आयुक्तांना देण्यात आले.
महानगराध्यक्ष दिपक सुर्यवंशी, डॉ. राधेशाम चौधरी, नगरसेविका उज्ज्वला बेंडाळे, माजी नगराध्यक्ष सदाशिव ढेकळे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा दिप्ती चिरमाडे, रेखा कुलकर्णी, प्रसिध्दीप्रमुख मनोज भांडारकर यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांचा आंदोलनात सहभाग होता. यावेळी महापालिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. घोषणांनी महापालिका परिसर दणाणला होता. महापालिकेकडून नुकतीच घरपट्टीत वाढ करण्यात आली त्याबदल्यात वीज, रस्ते या मुलभूत सुविधाही नागरिकांना मिळत नाहीये. अंधाधुंद पध्दतीने घरपट्टी वाढविण्यात आली आहे. वाढीव घरपट्टी रद्द न झाल्यास तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल, असे यावेळी भाजप पदाधिकार्यांनी सांगितले.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/3033751000285146